SCHOLARSHIP

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्या.

  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु इच्छिणान्या विद्यार्थ्यांनी सबंधित फॉर्मून मधील सर्व महिती सुवाच्च अक्षरात, पुर्णपणे भरून दिलेल्या वेळेत महाविद्यालयात सादर करावेत. शिष्यवृत्तीच्या अर्जामध्ये नोदंवलेली जात आणि संबंधित शाळेच्या दाखल्यावर नमुद केलेली जात यामध्ये तफावत असल्यास सदर अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • पुर्णवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवत्ती मिळत नाही. ही अट विचारात घेऊन नोकरी करणाऱ्या किंवा शिकत असताना नोकरीवर लागलेल्या विद्यार्थ्यांनी तसे महाविद्यालयाच्या कार्यालयाला तत्परतेने कळवले पाहिजे
  • एका कुटुंबातील फक्त दोन अपत्यांनाच शिष्यवृत्ती घेता येते.
  • शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्याने राष्ट्रिय कृत बँकेच्या शाखेत खाते उघडणे आवश्यक आहे.
  • बाहेरच्या जिल्ह्यातून शिष्यवृत्ती घेऊन या महाविद्यालयात पुढिल शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथिल जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याचे जिल्हाबदल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला असल्यास विद्यार्थ्याने आपल्या शिष्यवत्तीच्या अर्जासोबत संबंधित कालखंडामध्ये शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • विद्यापिठ परीक्षा ऊत्तीर्ण होऊन विद्यार्थ्याने महाविद्यालयातुन दुसऱ्या महाविद्यालयात पुढिल वर्गासाठी प्रवेश घेतल्यास समाजकल्याण अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्या शिवाय त्याच्या अर्जाचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार नाही.
  • शिष्यवत्तीधारक विद्यार्थ्याची व्याख्यानाना / प्रात्याक्षिकांना / रा.से.यो./ राष्ट्रिय छात्र सेना / शारीरीक शिक्षण उपक्रमांना किमान ७५% उपस्थिती असणे बंधणकारक आहे. यापेक्षा कमी उपस्थिती असणान्या विद्यार्थ्याना शासनाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती मिळणार नाही..